Rajarshi Shahu Sahakari Bank Ltd pune

Chairman Desk

अर्थिक प्रगती करणे तसेच गुणवत्तापूर्ण दर्जात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त ग्राहकांना बँकीग सेवा सुविधा अखंड देण्याला बॅक वचनबध्द आहे.

आपल्या बँकेचा विश्वास आहे की सभासद केवळ सभासद नसून मार्गदर्शक व बँकेच्या प्रगतीसाठीचे आधारस्तंभ आहेत हृदयस्थानी असून तो बँकेचा आत्मा आहेत. आपल्या बँकेचे ग्राहक हे कायम

आपल्या बँकेचा मुख्य उददेश समाजतील विविध स्थरातील जनमानसाला, विविध संस्था यांना उच्च तत्रंज्ञानाद्वारे व्यत्कीगत बँकींग सेवा सुविधा देऊन सभासद, खातेदार यांची पुढील पिढी अर्थिक दुष्ट्या सक्षम करून सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी तत्पर राहणे हा आहे.

आपल्या बँकेने सन्मानिय सभासद, ग्वातेदार याच बरोबर जिव्हाळयाचे संबध जोपासत कायमच विनाविलंव तत्पर सेवा देण्यावर भर दिलेला आहे. बँकेने आजपर्यंत प्रगती करताना विविध प्रसंग अनुभवले असून त्यातून बोध घेऊन सकारत्मक कामकाज करण्यास प्राध्यान्य दिले आहे.

आपल्या बँकेने आपल्या सेवेव्दारे आजपर्यत समाजातील विविध घटकांना त्यांची उदिष्टे साध्य करण्यास मदत केली आहे. त्यामध्ये स्वःताचा पहिला उपक्रम सुरू करण्याचे स्वप्न पाहणारा तरूण उद्योजक असो कि मुलांचे शिक्षण, आरोग्य, विवाह इ. साठी बचत करणारे कुटुंब अथवा जेष्ठ नागरिक असोत इ. समावेश आहे

आपली बैंक सातत्याने समाजातील एक विश्वासू अर्थिक भागिदार म्हणून कार्यरत असून आजपर्यतचा प्रवास उल्लेखनिय आहे सन्मानिय सभासद, खातेदार हितचितंक यांचा बँकेवर व मा. संचालक मंडळ यांच्यावर असणारा विश्वास व भरभक्कम पाठिंबा यामुळे आपल्या बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२०२४ पर्यंत ठेवी रक्कम रू. १०७० कोटी, कर्ज रक्कम रू.६२० कोटी, नफा रक्कम रू. १७ कोटी, नेट एनीपीए ‘0’ %, पोव्हिजन कव्हरेज रेशो १00%, CRAR 21.40% त्याचबरोबर ऑडिट वर्ग ‘अ’ असा प्रगतीचा वाढता आलेख आहे. आपल्या बँकेला कराव्या लागणा-या विविध तरतूदीमुळे बँकेचा आर्थिक पाया मजबूत झाला आहे.

मा. संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, व सेवक वर्ग यांनी बेंकिग मधील मूलभुत तत्वे जोपासत सामूहिक कामगिरी केली आहे. सदर सर्व यशाचे शिल्पकार आपण सर्वजण आहात हे प्राध्यान्याने नमूद करण्यात मला विशेष आनंद होत आहे.

आपली बँक सात्यत्याने भविष्यातील प्रगती साधण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्नशील राहिल याबाबत मी खात्री देतो.

धन्यवाद. जय सहकार 

×