बँकेने गतवर्षी केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि त्यामधील ठळक मुद्दे आपणा समोर प्रस्तुत करताना मला विशेष आनंद होत आहे.
कोरोना महामारीच्या संकटानंतर सन २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमधे हळूहळू सुधारणा होऊन तिने सुदृदतेकडे वाटचाल केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेने केलेल्या धोरणात्मक सुधारणा आणि संरचनात्मक बदलामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही सक्षम राहिली. त्यामुळे व्यवसाय वाढीला आणि गुंतवणुकीला निश्चितच चालना मिळाली आहे. यामधे भारतीय बँकांनी मागणीप्रमाणे अधिकाधिक कर्ज पुरवठा करून आपली महत्त्वाची भूमिका पार पाडली त्याबरोबरच कर्जाची गुणवत्ता अबाधित ठेऊन योग्य प्रमाणात नफ्याचे नियोजन करून भांडवल पर्याप्ततेचे निकष अबाधित ठेवले. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे पतपुरवठ्याला प्रोत्साहन मिळाले. बँकांनीही वाढत्या कर्ज मागणीचा विचार करून एकूण ठेवी मध्येही पुरेशी वाढ केली. एकूणच सर्व पातळीवरील आर्थिक सुधारणा आणि गुणात्मक बदलामुळे बँकांना उत्तम नफ्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये भरीव योगदान देता आले.
राजर्षी शाहू बँकेने पारंपारिक व्यवसाय धोरण अवलंबून उपलब्ध असणाऱ्या संधी आणि येणाऱ्या अडचणींवर मात करून व्यवसायात वाढ केली आहे. यामध्ये ठेवी आणि कर्ज यामध्ये पुरेशी वाढ करून चांगला नफा कमावलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त ठेवी ह्या बचत आणि चालू खात्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेले अग्रक्रम क्षेत्र कर्जाचे उद्दिष्ट तसेच रुपये २५ लाख पर्यंत एकूण कर्जाच्या ५०% पेक्षा अधिकच्या कर्जाचे उद्दीष्ट साध्य केले आहे. तसेच अनुत्पादित कर्ज खात्यामध्ये चांगली वसुली करून आणि योग्य त्या रकमेची तरतूद करून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे.
राजर्षी शाहू बँकेने पारंपारिक व्यवसाय धोरण अवलंबून उपलब्ध असणाऱ्या संधी आणि येणाऱ्या अडचणींवर मात करून व्यवसायात वाढ केली आहे. यामध्ये ठेवी आणि कर्ज यामध्ये पुरेशी वाढ करून चांगला नफा कमावलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त ठेवी ह्या बचत आणि चालू खात्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेले अग्रक्रम क्षेत्र कर्जाचे उद्दिष्ट तसेच रुपये २५ लाख पर्यंत एकूण कर्जाच्या ५०% पेक्षा अधिकच्या कर्जाचे उद्दीष्ट साध्य केले आहे. तसेच अनुत्पादित कर्ज खात्यामध्ये चांगली वसुली करून आणि योग्य त्या रकमेची तरतूद करून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात यश मिळवले आहे.
चालू आर्थिक वर्षात व्यवसाय धोरणात अमुलाग्र बदल करून एकूण व्यवसायामध्ये भरीव कामगिरी करण्याचा निश्चय केला असून यामध्ये प्रामुख्याने तांत्रिक सुधारणासाठी उपाययोजना तसेच जातीत जास्त ग्राहकांपर्यंत डिजिटल सेवा पोहोचवून कार्यक्षमतेमधे वाढ करणे यावर भर असेल. यामध्ये एटीएम, UPI, मोबाइल बँकिंग, व्हॉट्सअँप बँकिंग, QR Code, Net banking या सुविधा १००% ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.
अग्रक्रम क्षेत्रामधील विविध घटक जसे की. किरकोळ व्यापारी, एमएसएमई, वाहन कर्ज, वैद्यकिय सेवा करीता कर्ज, महिलांकरिता कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोलर एनर्जीवर आधारित योजना करीता वैयक्तिक तसेच उद्योग समूहाला कर्ज ,घर कर्ज आणि शेती व शेती पूरक कर्जे यावर अधिक भर दिला जाईल.
बचत आणि चालू खात्यांमध्ये वाढ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल. एकूणच खाती आणि त्यामधील रक्कम यात प्रामुख्याने वाढ केली जाईल जेणेकरून cost of deposit कमी राहील. व्यवस्थापन खर्च कमीत कमी कसा राहील यासाठी प्रयत्न राहतील.
इतर उत्पन्नाचे स्त्रोत जसे की जीवन विमा आणि जनरल विमा, म्युच्युअल फंड इत्यादी मधून वाढवले जाण्यासाठी योजना कार्यान्वीत केलेल्या आहेत. तसेच Foreign remittance ची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
रिझर्व्ह बँकेने अग्रक्रम क्षेत्रामध्ये करावयाच्या कर्जाचे उदिष्ट तसेच रुपये २५ लाख पर्यंत च्या कर्जाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
SMA वर्गवारीमधील कर्जाच्या थकीत रकमेच्या वसुलीवर अधिक लक्ष्य केंद्रित केले जाईल जेणेकरून अनुत्पादक खात्यामध्ये वाढ होणार नाही.
अनुत्पादक खात्यामधील वसुलीसाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्यामधून जास्तीतजास्त वसुली केली जाईल.
बँकेच्या अस्तित्वात असणाऱ्या ग्राहकाबरोबरचे संबंध अधिक दृढ आणि उत्तम करण्यावर विशेष भर दिला जाईल. उत्तम ग्राहक सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे सेवा प्रदान करण्यात येतील.
सहकार क्षेत्रामध्ये बँकेचे स्थान अधिक मजबूत बनवण्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांचे ज्ञानआणि कौशल्य यामध्ये वाढ करण्याकरिता आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे जेणेकरून परिपूर्ण बँकर म्हणून बँकेच्या धोरणानुसार उपलब्ध सर्व सेवा, सुविधा ते ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू शकतील आणि उत्तम सेवा प्रदान करू शकतील.